ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया (टी एन ए आय), महाराष्ट्र शाखा हि सर्वात जुनी आणि शंभर वर्षाहून अधिक काळ सतत कार्यरत असलेली शाखा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तिचे मुख्य कार्यालय मुंबईतील विविध रुग्णालयात होते.

टी एन ए आय ची स्थापना जे जे रुग्णालयात झाली होती (१९०८). त्यामुळे जे जे रुग्णालयातच पुढे मुंबई सिटी ब्रांच व महाराष्ट्र ब्रांच ह्यांची कार्यालये होती. महाराष्ट्र शाखेचे कार्यालय काही काळ नागपूर येथेही होते.

पूर्णवेळ कार्यालय नसल्यामुळे ज्या ठिकाणी अध्यक्ष व सेक्रेटरी असतील तिथे कार्यालय असायचे. मुंबई शाखेचे कार्यालय पुढे बॉम्बे हॉस्पिटल मध्ये व त्यानंतर के ई एम हॉस्पिटल मध्ये दीर्घ काळ होते. तसेच महाराष्ट्र शाखेचे कार्यालय कुपर हॉस्पिटल मधेही काही काळ होते. महाराष्ट्र शाखेचे पूर्ण वेळ व कायमस्वरूपी कार्यालय असावे ह्यासाठी १९८० पासून प्रयत्न सुरु होते व त्यासाठी काही निधीची तरतूदही केली होती.

SNA 2023

Student Nurses Association

Maharashtra Branch

भावी नेतृत्व तयार करण्यासाठी सर्व परिचारिका विद्यालयात ह्याच्या शाखा स्थापन केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुयोग्य असे कार्यक्रम सर्व परिचारिका विद्यालयात आयोजित केले जातात.  तसेच स्थानिक, व राज्य स्तरावर विविध स्पर्धा, परिषदा आयोजित केल्या जातात.

प्रत्येक विद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी निवडले जातात व प्राचार्य किंवा एक अध्यापक मार्गदर्शक म्हणून निवडले जातात. राज्य स्तरावरहि अशीच व्यवस्था आहे. राज्य विद्यार्थी प्रतिनिधी आहेत.

We Are In A Mission

Explore Our News & Updates

SUBSCRIBE
FOR NEWSLETTER